Austria School Firing- मोठी बातमी! विद्यार्थ्याने शाळेत घुसून केला अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू; स्वतःलाही संपवलं

Austria School Firing- मोठी बातमी! विद्यार्थ्याने शाळेत घुसून केला अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू; स्वतःलाही संपवलं

ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना समोर आली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सी एपीएच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी सांगितले की, या गोळीबारात 7 विद्यार्थ्यांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एक विद्यार्थी बंदूक घेऊन आला होता. या विद्यार्थ्याने समोर येणाऱ्या प्रत्येकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की त्यांना सकाळी 10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) माहिती मिळाली आणि त्यानंतर काही वेळातच शाळेच्या इमारतीतून गोळीबाराचे आवाज ऐकू आले.

घटना घडताच स्थानिक पोलिसांनी लोकांना त्या भागापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले आहे की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाचे ग्राझ शहर देशाच्या आग्नेयेस स्थित आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे 3 लाख इतकी आहे.

अहवालानुसार, ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर यांनी सांगितले की, मृतांमध्ये 7 विद्यार्थी एक शाळेचा कर्मचारी आणि गोळीबार करणारा गुन्हेगार यांचा समावेश आहे. शाळेतील गोळीबाराच्या चौकशीची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराला रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, काही लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;