Chhatrapati Sambhajinagar News – वटपौर्णिमेची पूजा करायला गेल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावलं मंगळसूत्र

Chhatrapati Sambhajinagar News – वटपौर्णिमेची पूजा करायला गेल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावलं मंगळसूत्र

वटपौर्णिमानिमित्त राज्यात हिंदू महिलांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सणानिमित्त वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली जाते आणि वडाला सात फेऱ्या मारल्या जातात. महिला साजशृगांर करुन सौभाग्याचं लेणं म्हणजेच मंगळसूत्र परिधान करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये हेच सौभाग्याच लेणं चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला आहे. याप्रकरणी जवाहनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर परिसरातील लक्ष्मीनगर भागात असलेल्या जानकी हॉटेलच्या पाठीमागे वटपुजेसाठी शोभा गोविंद होट्टे ही महिला जात होती. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी शोभा होट्टे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. काळ्या टिशर्टवर आलेल्या या तरुणांनी रुमालाने तोंड बांधले होते. महिलेने आरडा-ओरड करेपर्यंत ते सुसाट पळून गेले. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांचे पिंपळाला ‘उलटे फेरे’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;