Pune News – कर्तव्यावर असलेल्या महिला वनकर्मचाऱ्यांनी साजरी केली वटपौर्णिमा

Pune News – कर्तव्यावर असलेल्या महिला वनकर्मचाऱ्यांनी साजरी केली वटपौर्णिमा

जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करत सुवासिनींकडून वटवृक्षाचे पूजन केले जाते. एकीकटे उत्सव आणि एकीकडे कर्तव्य याची योग्य सांगड घालत महिला वनपाल आणि वनरक्षक यांनी ऑनड्युटी असतानाच वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या रोपांचे वाटप करून तसेच रोपण करून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संकल्पही केला.

वनपरिक्षेत्र मंचर अंतर्गत मोठ्या संख्येने तरुण वनरक्षक अधिकारी व वनपाल कर्मचारी नवीन नियुक्त झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. सण-उत्सव असतानाही या महिला वनरक्षकांकडून कर्तव्याला प्राधान्य दिले जाते. दररोज बारा तास ड्युटी करून कुटुंब सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागते. अशाच पद्धतीने वटपौर्णिमेनिमित्त मंगळवारी (10 जून 2025) ऑनड्युटी असलेल्या वनपरिक्षेत्र मंचर येथील वडाचे पूजन महिलांनी केले. मंचर कार्यालयात सहा महिला वनरक्षकांनी गणवेशात पूजन केले. यामध्ये सोनल भालेराव वनपाल कळंब, पूजा पवार वनरक्षक कुरवंडी, सी. एस. शिवशरण वनरक्षक मंचर, के. एस. डाखोरे वनरक्षक कोपरे, एस. पी. शिंदे वनरक्षक परसुल, एम. आर. शेळके वनरक्षक खेड, ए. पी. पवार लेखापाल मंचर महिला वनरक्षकांनी कार्यालय परिसरात वटपोर्णिमा साजरी केली.

“सण-उत्सव साजरे करण्यासाठी सुट्टी मिळतेच असे नाही. त्यामुळे शक्य होईल तसा याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो. लग्नानंतर आत्तापर्यंत सर्वच वटपौर्णिमेला ऑनड्युटी असल्याने नियमित कामकाज करून वडाच्या झाडाची पूजा करत आलो आहे. दरवर्षी वटपौर्णिमेला वृक्षारोपण करण्याचा आम्ही संकल्प केला आहे”, असे महिला वनरक्षक सोनल भालेराव यांनी सांगितले.

“दरवेळी पारंपरिक साडी परिधान करून, इतर स्त्रियांप्रमाणे वेळ काढून वटवृक्षाची पूजा करावी असे वाटते. पण वनविभागात कार्यरत असल्याने अगोदर कर्तव्य पार पाडत गणवेशातच वटवृक्षाची पूजा करून सण साजरा करतो. यात एक वेगळा आनंद मिळतो. अशाच पद्धतीने इतर सर्व सण साजरे करतो”, असे स्मिता राजहंस, सहाय्यक वनरक्षक जुन्नर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;