तमिळनाडूतील प्रसिद्ध मंदिरात मांसाहार करताना पकडलं, चौकशी सुरू

तमिळनाडूतील प्रसिद्ध मंदिरात मांसाहार करताना पकडलं, चौकशी सुरू

तमिळनाडूतील तिरूवन्नामलाई या प्रसिद्ध मंदिरात एक धक्कादायक घटना घडली. येथे मंदिरात दर्शनासाठी आलेला एक व्यक्ती मंदिर परिसरात मांसाहारी अन्न खाताना आढळून आला. याची माहिती मिळताच मंदिर प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिरूवन्नामलाई मंदिर परिसरात घडली. या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांनी या व्यक्तीला मंदिर परिसरात मांसाहारी जेवण करताना पाहिले. त्यामुळे त्यांनी लगेचच मंदिर प्रशासनाला याबाबत माहिती दिली. यावेळी मंदिराच्या वरिष्ठांनी त्या व्यक्तीची चौकशी केली. तेव्हा त्यांने मी शाकाहारी जेवण मागवले होते. पण कदाचीत चुकून मांसाहारी जेवण आले असावे, असे त्या व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, मंदिर प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणावर चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;