शेंद्रा MIDC च्या ट्रक टर्मिनलमध्ये गैरव्यवहार, शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नसता टेंडर कशाप्रकारे मिळालं? अंबादास दानवेंचा सवाल

शेंद्रा MIDC च्या ट्रक टर्मिनलमध्ये गैरव्यवहार, शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नसता टेंडर कशाप्रकारे मिळालं? अंबादास दानवेंचा सवाल

संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या राखीव भूखंडात गैरव्यवहार झाला असून याबाबत येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना जाब विचारणार आहे. शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नसताना त्यांना टेंडर कशाप्रकारे मिळालं, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलसाठी राखीव 5 एकर भूखंडाचे आरक्षण हटवून, तो प्लॉट आपल्या मुलाच्या कंपनीला ‘Cameo Distilleries Pvt. Ltd.’ ला देण्याची अवैध प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये 2 भूखंड ट्रक टर्मिनलसाठी राखीव ठेवण्यात आले होते. एक भूखंड 42000 चौरस मीटर (250 ट्रक उभे राहतील इतक्या क्षमतेइतका) आणि दुसरा भूखंड 21275 चौरस मीटर (70-80 ट्रक क्षमतेइतका)आहे.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या उद्योगांना

दुसऱ्या भूखंडाची गरजच नाही, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या गळी उतरवले आणि त्यांचे ट्रक टर्मिनलसाठी असलेले आरक्षण हटवले. सदर जागा 6.9 कोटींना खरेदी केली.

Cameo Distilleries’ कंपनीची स्थापना फेब्रुवारी 2022 ला झाली. जून 2022 ला सिद्धांत शिरसाट यांनी भूखंडासाठी अर्ज केला. यासाठी 105 कोटींच्या भांडवली प्रकल्पाचे प्रस्तावित मॉडेल होते. 26.47 कोटी स्वतःचे भांडवल आणि 79.42 कोटी बँकेकडून कर्ज घेण्यात आले. पत्नी विजया शिरसाट यांचे उत्पन्न 25 लाख असूनही, त्यांना 5.65 कोटी युको बँकेकडून कर्ज मिळाले. त्यामुळे दानवे यांनी शंका उपस्थित केली.

सिद्धांत शिरसाट यांनी स्थापन केलेल्या कंपनीत 3 मूळ डायरेक्टर हे सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट (पत्नी), अमिन भावे (बिल्डर हे इतकेच आहेत. या प्रकरणानंतर भावे यांनी नंतर राजीनामा दिला. आता कंपनीचे फक्त 2 संचालक विजया आणि सिद्धांत आहेत. मुळात या कंपनीची नोंदणी झाली नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

महाराष्ट्रात मद्य निर्मितीमध्ये छत्रपती संभाजीनगर अव्वल स्थानावर आहे. याच मद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू व उत्पादन निर्मितीसाठी ‘कॅमिओ डिस्टिलरीज’ ची स्थापना करण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला. त्यामुळे ही जमीन देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;