मासळी कडाडली, खवय्यांचे झाले वांदे; सुरमई-1200, पापलेट- 1300, जिताडा-1400, कोळंबी- 600 रुपये किलो

मासळी कडाडली, खवय्यांचे झाले वांदे; सुरमई-1200, पापलेट- 1300, जिताडा-1400, कोळंबी- 600 रुपये किलो

राज्य सरकारने पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केल्यानंतर हजारो बोटींनी बंदरात नांगर टाकला आहे. त्यामुळे मासळीची आवक घटली असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. एक हजार रुपये किलोने मिळणारा जिताडा आता थेट एक हजार 400 रुपयांवर गेला आहे.

पापलेट एक हजार 300 तर सुरमई एक हजार 200 रुपयांत किलोभर मिळत आहे. मासळीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने खवय्यांचे वांदे झाले आहेत. १ जूनपासून सुरू झालेली ही मासेमारी बंदी येत्या ३१ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे खवय्यांना दोन महिने चढ्या दराने मासळी खरेदी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 60 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केल्यानंतर करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड आदी विविध बंदरात हजारो बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत त्याचा मोठा परिणाम मासळीच्या बाजारावर झाला आहे. आवक कमी झाल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मासळीच्या तुटवड्यामुळे आणि भाव कडाडल्याने मात्र मासळी खवय्यांच्या खिशाला चाट बसली आहे. एक किलो कोळंबी आणि बांगडा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अनुक्रमे ६०० आणि २५० रुपये मोजावे लागत आहेत. शासनाने जारी केलेल्या मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांना समुद्रात १२ नॉटिकल सागरी मैलाच्या आतील खोल समुद्रातील मासेमारी करता येत नाही. समुद्राच्या याच भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मात्र बंदीमुळे ही मासेमारी आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अन्य राज्यांत बंदी नाही
केंद्र सरकारची पश्चिम तटीय क्षेत्रातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, कन्याकुमारी, केरळ आदी राज्यांना मासेमारी बंदी लागू नसते. त्यामुळे या राज्यात मासळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र त्याचे दरही मासळी खवय्यांना परवडणारे नसल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;