अघोषित आणीबाणीचे वातावरण, चंद्रकांत कुलकर्णींचं परखड मत
तुमच्या अभिव्यक्तीवर जेव्हा वेगळ्याच शक्ती काम करत असतात, अशा अघोषित आणीबाणीचे वातावरणात आपण वावरत आहोत, असं परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात निळू फुले कृतज्ञता सोहळ्यात बोलताना सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर त्यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, “सध्या कोणालाही बोलताना आणि कुठलाही शब्द उच्चारताना धाडस गोळा करावं लागतं, असं आजूबाजूला वातावरण आहे.” दरम्यान, कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी निळू फुले यांच्या आठवणी सांगत त्यांचं कौतुक केलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List