आम्हाला अपत्य व्हावी अशी माझी इच्छा; बादशाहने केली ‘दिल की बात’, चर्चांना उधाण

आम्हाला अपत्य व्हावी अशी माझी इच्छा; बादशाहने केली ‘दिल की बात’, चर्चांना उधाण

बॉलीवूड रॅपर आणि गायक बादशाह त्याच्या नवीन गाण्यांसाठी आणि International Collab मुळे नेहमीच चर्चेत असतो. चाहते त्याच्या नवीन गाण्यांची आतुरतेने वाट पाहतात. बादशाह केवळ एक गायकच नाही तर मोस्ट एलिजिबल बॅचलर्सच्या यादीतही त्याचा समावेश होतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्याने वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. बादशाहचे नाव अनेकदा कोणात्याही सेलिब्रेटीसोबत तरी जोडले जाते. यावेळी देखील त्याची एक कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे.

रॅपर बादशाह सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. दरम्यान, सोशल मीडिया साइट X वर बादशाहचे एक ट्विट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बादशाह अल्बेनियन गायिका दुआ लिपाबद्दल बोलताना दिसत आहे.

बादशाहने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट पोस्ट केली. त्यात त्याने दुआ लिपा असे लिहून त्यासोबत एक रेड हार्ट इमोजी टाकला आहे. यानंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. अनेक चाहते बादशाह आणि दुआ लिपाच्या डेटिंगबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये बादशाहला विचारले की ‘तू दुआसोबत काम करणार आहेस का?’ या प्रश्नाच्या उत्तरात बादशाहने असे काही म्हटले ज्यामुळे चाहत्यांना बोलण्याची आणखी एक संधी मिळाली.

चाहत्याच्या कमेंटला उत्तर देताना बादशहाने लिहिले की, ‘आम्हाला आपत्य व्हावी अशी माझी इच्छा’. बादशहाच्या या विधानामुळे ते दोघेही एकमोकांना डेट करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान यापूर्वी बादशहाचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरशी जोडले जात होते. हानिया बादशहाच्या कॉन्सर्टमध्येही दिसली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;