हिंदुस्थानची ‘कॉपी’ करायला गेले अन् तोंडावर आपटले, बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला अमेरिकन खासदाराने फटकारले

हिंदुस्थानची ‘कॉपी’ करायला गेले अन् तोंडावर आपटले, बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला अमेरिकन  खासदाराने फटकारले

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर पाकड्यांची पोलखोल करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळही पाठवले. याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले. बिलावर भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांची चांगलीच फजिती झाली आणि त्यांना दहशतवादावर कठोर बोल ऐकावे लागले.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते. यावेळी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य, ज्येष्ठ खासदार ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून पोस्टही शेअर केली आहे.

पाकिस्तानने दहशतवादी संघटनांचा खात्मा केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलायला हवीत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदवरही निर्णायक कारवाई करायला हवी. याच दहशतवादी संघटेने पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या केली होती, असे ब्रॅड शेरमन म्हणाले. 2002 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनिलय पर्ल यांचे अपहण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणा दहशतवादी उमर सईद शेखला दोषी ठरवण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;