लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरुन वाद विकोपाला, वधूच्या वऱ्हाड्यांकडून नवरदेवाची हत्या

लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरुन वाद विकोपाला, वधूच्या वऱ्हाड्यांकडून नवरदेवाची हत्या

लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरून झालेला वाद नवरदेवाच्या जीवावर बेतला आहे. नवरीकडील मंडळींनी नवरदेवाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे आनंदाच्या दिवशीच मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ही घटना घडली.

गाझीपूरच्या जगदीशपूर गावात लग्नाची मिरवणूक सुरू होती. यावेळी मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. नवरीच्या कुटुंबातील तरुण डीजेच्या तालावर नाचत होता. काही कारणातून त्यांचे नवरदेवाच्या नातेवाईकांशी भांडण झाले. यावेळी नवरदेवाच्या वडिलांनी भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र तरुणांनी नवरदेवाच्या वडिलांना मारहाण केली.

वडिलांना मारहाण होताना पाहून नवरदेव मध्ये पडला. मद्यधुंद तरुणांनी नवरदेवालाही मारहाण केली. एकाने बंदुकीचा दस्त्याने डोक्यात मारहाण केली. यामुळे नवरदेव बेशुद्ध झाला. त्याला गाझीपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने नवरदेव कोमात गेला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;