कोपरीत शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

कोपरीत शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

आनंदनगर कोपरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने नव्या शाखेचे तोरण बांधण्यात आले असून त्यामाध्यमातून स्थानिक रहिवाशांच्या अडचणी सोडवण्याचे काम करण्यात येणार आहे. नव्या शाखेचे उद्घाटन झाले तेव्हा उद्धव ठाकरे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी कोपरीचा परिसर दणाणून गेला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला.

कोपरी येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचे लोकार्पण करण्यात आले तेव्हा शिवसैनिकांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी व शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कोळी व शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांचे हक्काचे ठिकाण असून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करण्यात येणार आहेत. गद्दारांनी कितीही अडथळे आणले तरी शिवसेनेची तेजस्वी मशाल समाजसेवेच्या माध्यमातून धगधगत राहणार असून जनताच या गद्दारांना धडा शिकवेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी उपशहरप्रमुख प्रदीप शेंडगे, विभागप्रमुख स्वप्नील शिरकर, उपविभागप्रमुख प्रवीण झेंडे, शाखाप्रमुख नीलेश मालुसरे, महिला विभाग संघटक रंजना शेडगे, उषा मालुसरे, अश्विनी मालुसरे, कविता चोरगे, विद्या चव्हाण, सीमा शेडगे, स्वरा शिरकर, संतोष यादव, प्रसाद बहिरे, विजय दिघे, ओम शेडगे, राजेश पाटील, दत्ता पागवले, संतोष डंगारे, प्रदीप वाघ, सारंग कदम, मुकुंद मोरे, अरविंद चव्हाण, सचिन पागवले, रमेश शिर्के, रवींद्र सिनलकर, प्रमिला भांगे, ज्योती कोळी, अनिता प्रभू, अर्चना शाहीर, पौर्णिमा लाड, कविता सिनलकर, आरती मोरे, पूनम जाधव, मनीषा देशमाने, प्रियांका सुर्वे, जागृती तरे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;