Chhattisgarh Encounter – छत्तीसगमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलाच्या गोळीबारात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Encounter – छत्तीसगमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलाच्या गोळीबारात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांकडून करेगुट्टाच्या जंगलात तीन दिवसांपासून शोध मोहीम सुरू होती. तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील हजारो सैनिक या ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

बस्तर प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेपैकी ही एक सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स, विशेष कार्य दल (STF), राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि त्यांची एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (COBRA) यासह विविध युनिट्समधील सुमारे 10,000 जवानांचा सहभाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी वेढण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;