सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती शनिवारी शिमला येथे अचानक बिघडली. त्यांना तातडीने शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (IGMC) दाखल करण्यात आले आहे.

सध्या डॉक्टर सोनिया गांधी यांची वैद्यकीय तपासणी आणि एमआरआयसह विविध चाचण्या करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी या पाच दिवसांपूर्वी खासदार प्रियंका गांधी यांच्यासह शिमला येथे आल्या होत्या. या त्यांचा या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, गेल्या चार-पाच वर्षांत सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली आहे आणि विविध आरोग्य कारणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोनिया गांधी बऱ्याच काळापासून श्वसनाच्या समस्याने त्रस्त आहेत. 2022 मध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पुन्हा दाखल करावे लागले. सप्टेंबर 2022 मध्येही आरोग्य कारणांमुळे त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;