Megablock – रविवारी चाकरमान्यांचे ‘मेगा’ हाल! देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर ब्लॉक

Megablock – रविवारी चाकरमान्यांचे ‘मेगा’ हाल! देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर ब्लॉक

रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. उद्या (रविवारी) तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेमार्गावर देखभालदुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे रेल्वेवरील मीरा रोड आणि भाईंदरदरम्यान मेट्रो-9 च्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवार, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी शेवटच्या दोन चर्चगेट-विरार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील मेल, एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पनवेल-सीएसएमटीदरम्यानच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल डाऊन मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत आणि पनवेल ते ठाणे अप मार्गावरील सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;