मुंबई गिळण्यासाठी निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका जिंकणे त्यांना शक्य नाही -संजय राऊत

मुंबई गिळण्यासाठी निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका जिंकणे त्यांना शक्य नाही -संजय राऊत

मुंबई आणि महाराष्ट्र गिळायचे, ईस्ट इंडिया कंपनी सूरत यांचे मनसुबे मराठी माणूस पूर्ण हेऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. आता मुंबई निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले महापालिका निवडणुकीचे संकेत म्हणजे धमकी आहे. याआधी त्यांनी लोकसभा, विधानसभेला धमक्या दिल्या, आता महापालिकेसाठी देत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीसाठी देतील. ते निधी, धमक्या, खंडण्या यामुळे निवडणुका जिंकत आहेत. फडणवीस, मोदी, शहा कंपनी हे निवडणुका कशा जिंकतात, ते जनतेला माहिती आहेत. ते सर्व ईस्ट इंडिया कंपनीचे पार्टनर आहेत. त्यांचे हेडक्वॉटर सुरतमध्ये आहे, असे ते म्हणाले.

मुंबई जिंकायची आणि अमित शहा व्यापाऱ्यांच्या पायाशी टाकायची, हे यांचे धोरण आहे. पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी मुंबई घेतली. त्यानंतर याला भेट दिली, त्याला भेचट दिली, मजराणा दिला. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना मुंबईचा नजराणा ईस्ट इंडिया कंपनी, सूरत यांना द्यायचा आहे. त्यासाठी त्यांच्या धमक्या, दडपशाही, पैशांच्या उलाढाली सुरू आहेत. मात्र, मुंबईचे चित्र वेगळे आहे. विधानसभा निवडणुका ज्या पद्धतीने ते जिंकले आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची छीः थूः झाली आहे. बोगस मतदान याद्यांद्वारे एका तासात 65 ते 70 लाख मतं वाढवली. हे लोकशीही सुदृछ असण्याचे लक्षण नाही. मुंबई पालिकेच्या निवडणुकीतही त्यांना तेच करायचे आहे. मात्र, मुंबईकर आणि मराठी माणूस त्यांचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

आम्हाला मते दिली तरच निधी देईन, अशा धमक्या कोणत्या संविधानात बसतात.आम्ही त्यांना घचना, संविधानविरोधी म्हणतो, ते याचसाठी. आम्हाला मतं दिले तर विकास करू म्हणजे जे त्यांच्यासोबत नाहीत, त्यांना ते द्रारिद्रात आणि अविकसीत ठेवणार, हे यांचे वेगळे संविधान आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुका घेण्याआधी त्यांनी सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे, या निवडणुका फक्त भाजप किंवा फडणवीसांच्या नाहीत. लोकशाहीतील महापालिकेच्या या महत्त्वाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व पक्षांशी चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र, ते असे करणार नाहीत. विरोधी पक्षांची अडचण बघून त्यांची सेटिंग झाल्यावर ते निवडणुका घेतील. मात्र, आमचीही तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचा सर्व सत्ता आणि पैशांचा खेळ आहे. फडणवीस म्हणतात, निधी देईन, मिंधे रोकड्याने पैसे वाटत आहेत.ते गाड्यांमधून पैसे घेऊन फिरत आहेत. ही कशाप्रकारची लोकशाही देशात, राज्यात आणि मुंबईत सुरू आहे. 150 जागा घेण्याचा दावा करणाऱ्या भाजपने मुंबईच्या निवडणुका बॅलेट पेपरवर एऊन दाखवाव्यात. 100 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या मिंधेकडे 100 कार्यकर्तेही नसतील. त्यामुळे हा फक्त निधी आणि पैशांचा खेळ आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घाबरू नका, सगळं ठीक होईल; राहुल गांधींनी कश्मीरच्या सीमावर्ती भागातील शाळकरी विद्यार्थ्यांशी साधला संवाद घाबरू नका, सगळं ठीक होईल; राहुल गांधींनी कश्मीरच्या सीमावर्ती भागातील शाळकरी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी जम्मू आणि कश्मीरचा दौरा केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर...
Ratnagiri News – रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंचा कडक इशारा
IND Vs ENG – त्याला कसोटी संघात स्थान नाही…; श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा निराशा; अजित आगरकरांनी सांगितलं कारण
महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, रोहित पवारांची रुपाली चाकणकरांवर टीका
भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
…आणि त्याला एक संधी मिळाली! टीम इंडियामध्ये झालं पुनरागमन, आता धमाका करणार?
Ratnagiri News – रत्नागिरीत अवैधरित्या राहणाऱ्या 13 बांगलादेशींवर कारवाई; मायदेशात केली रवानगी