Bangaldesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार; मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली

Bangaldesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार;  मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. देशातील पुढील राष्ट्रीय निवडणूक 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 दरम्यान होईल, असे ते म्हणाले.  ईद उल अजहाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. निवडणूक आयोग यासंरदर्भात वलकरच एक सविस्तर आराखडा तयार करेल. सुधार, न्याय आणि निवडणूक हे अंतरिम सरकारच्या प्रमुख उद्देशांसह आपण हे पद सांभाळल्याचं युनूस यांनी जनतेला सांगितले.

युनूस यांच्या निवडणुकीच्या घोषणेमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी जनतेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली. देशातील पुढील निवडणूक इतिहासातील सर्वात निष्पक्ष, स्वतंत्र आणि स्पर्धात्मक, स्वीकारार्ह असेल. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्राप्रतींच्या प्रामाणिकपणाची, निष्पक्ष भावनेची आठवण करून दिली. युनूस यांनी याआधी देशात सुधारणा करण्याचा हवाला देत डिसेंबर 2025 आणि जून 2026 या कालावधीत कधीही निवडणूक होऊ शकते असं म्हटलं होते.

खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनीही डिसेंबर 2025 साली निवडणूक घेण्यावर जोर दिला होता. तसेच नवीन सिटिजन पार्टीने (NCP) सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पुढील काही महिन्यात न्यायिक आणि सुधारणा आराखडा याला अंतिम स्वरुप मिळेल. ज्याला व्यापक राजकीय पाठिंबा मिळू शकेल यामुळे बांगलादेशात रिफॉर्म कमिशन स्थापन झाले आहे. एका स्थायी सरकार आणि बांगलादेशात राजकीय स्थिरता देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असंही युनूस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 2024साली बांगलादेशात राजकरणात खळबळ उडाली होती. यावेळी देशात शेख हसीना यांच्या नेतृत्वातील आवामी लीग सरकारविरोधात कोटा सिस्टमवर नाराजी व्यक्त करत देशभरात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या हिंसक वातावरणामुळे 5 ऑगस्ट 2024 साली पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळण्यास मजबूर केले. आता सध्या शेख हसीना हिंदुस्थानात राहत असल्याचे बोलले जात आहे.

हसीना सरकार पाडल्यानंतर बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. हिंदुस्थाननेही बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेश निवडणूक प्रक्रिया लवकर घेण्याचे आवाहन केले होते. त्याशिवाय शेख हसीना यांच्या आवामी लीगवर बंदी आणल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नो-अ‍ॅडेड शुगर आणि शुगर फ्री मध्ये काय फरक आहे? 90 टक्के लोकांना याचा योग्य अर्थ माहित नसेल नो-अ‍ॅडेड शुगर आणि शुगर फ्री मध्ये काय फरक आहे? 90 टक्के लोकांना याचा योग्य अर्थ माहित नसेल
आजकाल, जेव्हा आपण बाजारातून कोणतीही पॅक केलेली वस्तू खरेदी करतो तेव्हा त्यावर “नो अॅडेड शुगर” किंवा “शुगर फ्री” असे लिहिलेले...
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना कधीही करू नका ‘या’ 4 चुका; अन्यथा ठरेल विष
लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरुन वाद विकोपाला, वधूच्या वऱ्हाड्यांकडून नवरदेवाची हत्या
पत्नीचे शीर हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, असं काय घडलं की पतीच जीवावर उठला
अघोषित आणीबाणीचे वातावरण, चंद्रकांत कुलकर्णींचं परखड मत
Maharashtra Election 2024 : लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान
मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट