वयाच्या 91 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार मिस्टर परफेक्शनिस्टची आई; आमिरने दिली माहिती

वयाच्या 91 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार मिस्टर परफेक्शनिस्टची आई; आमिरने दिली माहिती

बॉलीवूडचा सुपरस्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटातून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट आमिरच्या 2008 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरलाच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘सितारे जमीन पर’चे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख देखील दिसणार आहे. तसेच आणखी एका पाहुण्या कलाकारचे आगमन होणार आहे. याबाबत आमिरने स्वत: माहिती दिली आहे.

आमिर खानने शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी खास संवाद साधला. यादरम्यान आमिरने त्याच्या चित्रपटाशी संबंधित काही किस्से सर्वांसोबत शेअर केले. त्याने सर्वांना सांगितले की, त्याची आई झिनत खान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तसेच, तो पहिल्यांदाच त्याची बहीण निखत खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आई आणि बहीण दोघांसोबत त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे हा प्रसंग माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप खास असल्याचे त्यांने सांगितले.

आमिरची आई या चित्रपटात झळकणार असल्याचे आमिरने यावेळी सांगितले. त्याच्या आईला चित्रपटात काम करायला लावण्याची त्याची कोणतीही योजना नव्हती. पण दिग्दर्शकाच्या आग्रहामुळे ते शक्य झाले. ‘सहसा अम्मी मला सांगत नाही की तिला माझ्या चित्रपटाच्या शूटिंगला यायचे आहे. मला माहित नाही तिला असे का वाटले पण एके दिवशी सकाळी आम्ही चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग करत असताना अम्मीने मला फोन केला आणि विचारले की तू कुठे शूटिंग करत आहेस. आज मलाही शूटिंगसाठी यायचे आहे, असे ती म्हणाली.

मी तिला यायला सांगितले. मी तिच्यासाठी गाडी पाठवली आणि माझ्या बहिणीला तिला सेटवर आणायला सांगितले. ती सेटवर व्हीलचेअरवर आली. तेव्हा आम्ही एका लग्नाच्या गाण्याचे शूटिंग करत होतो आणि ती आम्हाला पाहत होती. मग दिग्दर्शक प्रसन्ना माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर, जर तुम्हाला हरकत नसेल, तर तुम्ही अम्मीजींना चित्रपटाच्या गाण्यात येण्याची विनंती करू शकता का? हे चित्रपटाचे शेवटचे गाणे आहे, हा लग्नाचा सोहळा आहे. त्या या गाण्यात पाहुण्या म्हणून येऊ शकतात. त्यांना चित्रपटात घेणं ही माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट आहे आणि मी त्यांना आपल्या चित्रपटाचा भाग बनवू इच्छितो., असे प्रसन्ना मला म्हणाला.

दिग्दर्शकाचे बोलणे ऐकून मी थोडा घाबरलो , असे आमिर म्हणाला. मला वाटल कदाचित आईला हे आवडणार नाही आणि ती काम करण्यास नकार देईल. तेव्हा मी प्रसन्नला सांगितले, तू वेडा झाला आहेस का? अम्मीला चित्रपटात काम करायला सांगण्याची माझी हिंमत होणार नाही. ती खूप हट्टी आहे, ती माझे ऐकणार नाही. तुमचा वेळ वाया घालवू नका. पण तरीही प्रसन्ना मला विनंती करत राहिला. त्यामुळे अखेर मी अम्मीला विचारले. अम्मी, प्रसन्ना तुम्हाला पाहुण्या म्हणून चित्रपटात एक शॉट देण्याची विनंती करत आहे. तिने उत्तर दिले की हो, ठीक आहे. ते ऐकून मला धक्का बसला.

सितारे जमीन पर या माझ्या चित्रपटात माझी आई एक-दोन शॉटमध्ये दिसणार आहे. हा माझा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये ती भाग घेत आहे. त्य़ामुळे हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. तिच्या मनात काय आले ते मला माहित नाही. आमचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक आठवडा आधी, 13 जून रोजी ती 91 वर्षांची होणार आहे.’म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी ती माझ्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे., असे आमिरने सांगितले.

Aamir Khan- आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट
आजकाल लोक तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक गोष्टी करून पाहतात. काही लोक व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात, तर काही घरगुती उपाय करून पाहतात....
नाश्त्यात ‘हा’ पांढरा पदार्थ खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते, तुम्ही ते खाण्याची चूक करत आहात का?
Sindhudurg News – कणकवली रेल्वे स्थानकातील छताच्या सिलिंगचा काही भाग कोसळला; कमाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी
Megablock – रविवारी चाकरमान्यांचे ‘मेगा’ हाल! देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर ब्लॉक
ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं – सत्यपाल मलिक
दहशतवादी मसूद अझहरच्या कुरापती, कश्मीरनंतर आता म्यानमारमध्ये उभारतोय जिहादी नेटवर्क
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल