SDM वर बंदूक रोखणाऱ्या भाजप आमदाराचे सदस्यत्व रद्द; राजस्थान विधानसभा अध्यक्षांची कारवाई
राजस्थानात उपविभागीय दंडाधिकाऱ्याला (SDM) पिस्तूल दाखवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल दोषी आढळलेले भाजप आमदार कंवर लाल मीणा यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभेच्या सचिवालयाने या संदर्भात अधिसूचना जारी करून आमदार कंवरलाल मीणा यांचे 1 मे 2025 पासून विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाल्याचे म्हंटले आहे.
विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी राज्याचे महाधिवक्ता आणि वरिष्ठ वकिलांकडून या प्रकरणात कायदेशीर उत्तराची अपेक्षा केली होती. यादरम्यान शुक्रवारी राज्याचे महाधिवक्त्यांनी आपले मत मांडले. यावेळी एजीने सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा हवाला दिला. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत नाही तोपर्यंत सदस्यत्व रद्द करणे हा एकमेव पर्याय असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शुक्रवारी राज्याच्या महाधिवक्तांकडून कायदेशीर उत्तर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी सांगितले. कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने अभ्यास केला जातो आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कोणतेही काम केले जात नाही. या प्रकरणात राजकारण करू नये आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
सुमारे 20 वर्षांपूर्वी एका एसडीएमवर बंदूक रोखल्याच्या प्रकरणात मीणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर 14 डिसेंबर 202 रोजी, अक्लेरा येथील न्यायालयाने मीणा यांना 20 वर्षे जुन्या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आणि सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि मालमत्तेची तोडफोड करणे या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List