काळे चणे कोणत्या प्रकारे खाणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

काळे चणे कोणत्या प्रकारे खाणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे फारस लक्ष देत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशातच जेव्हा निरोगी आहाराचा विचार केला जातो तेव्हा काही देशी सुपरफूड्स आहेत जे पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. काळे चणे हे त्यापैकी एक आहे. हे लहान दिसणारे काळे चणे प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक खनिजांचा खजिना आहे. हे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी एक उत्कृष्ट प्रथिन स्रोत मानले जातात.

आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून भारतीय घरांमध्ये सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले काळे चणे सेवन केले जात असत. कारण यांच्या सेवनाने आरोग्याला पोषण मिळते. आजकाल आरोग्य तज्ञ आणि पोषणतज्ञ देखील मोड आलेले काळे चणे खाण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की भिजवलेले काळे चणे फायदेशीर आहे की मोड आलेले चणे ? तसेच हे काळे चणे नेमकी कोणत्या प्रकारे खाणे अधिक फायदेशीर आहे हे आपण आजच्या या लेखात तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात…

भिजवलेले काळे चणे खाण्याचे फायदे

रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे चणे सकाळी रिकाम्या पोटी खाण्याची शिफारस केली जाते. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. या भिजवलेल्या काळे चण्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच यांच्या सेवनाने शरीराला बराच काळ ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे थकवा येत नाही. ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी भिजवलेले काळे चण्यांचे सेवन फायदेशीर आहेत. त्यात कॅलरीज आणि फायबर कमी असतात, म्हणून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.

मोड आलेले काळे चणे खाण्याचे फायदे

जेव्हा भिजवलेले काळे चण्यांना मोड येते तेव्हा ते अधिक पौष्टिक बनतात. तर मोड आलेले काळे चणे खाल्ल्याने शरीरात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले फायदेशीर ठरते. मोड आलेल्या काळ्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांचे सेवन केल्याने शरीरात लोह आणि कॅल्शियमचे शोषण सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.

तज्ञांचे मत

जयपूरच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. मेधावी गौतम म्हणतात की, काळे चणे भिजवून आणि मोड आलेले चणे दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. परंतु मोड आलेल्या चण्यांमध्ये लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ते खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. काही लोकं सकाळी रिकाम्या पोटी काळे चणे खातात, तर काही जण संध्याकाळच्या नाश्त्यात खातात. परंतु तज्ज्ञ मेधावी गौतम यांच्या मते, संध्याकाळच्या नाश्त्यात मोड आलेले काळे चणे खाणे चांगले.

या चण्यांचे किती प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

ज्या लोकांना मसल्स गेन करायचे आहेत ते मोठ्या प्रमाणात काळे चणे खातात कारण ते प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. अशातच हे चणे किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल बोलायचे झाले तर मेधावी गौतमच्या मते, दिवसातून 25-30 ग्रॅम काळे चणे खाऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल