भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. अपघातामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील गुव्वालाचेरुवु घाट रस्त्यावर शनिवारी हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटात भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. यामुळे कार खड्ड्यात कोसळली. यानंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकही खड्ड्यात कोसळलेल्या कारवर धडकला. यात कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील चौघेही जण जागीच ठार झाले. तर ट्रक चालकाचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. या अपघातामुळे गुव्वालाचेरुवु घाट रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. कारमधील चौघे जण एकाच कुटुंबातील सदस्य असून, बडवेल मंडळातील चिंतापुत्तयपल्ले येथील रहिवासी होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List