अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज-2 Liver Cancer; या सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज-2 Liver Cancer; या सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

‘ससुराल सिमर का’ आणि ‘बिग बॉस 12’ सारख्या सुपरहिट टीव्ही शोसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या गंभीर आजाराशी झुंजत आहे. दीपिकाने स्वतः इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे की ती यकृताच्या कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दीपिकासारख्या तंदुरुस्त आणि सक्रिय अभिनेत्रीला या आजाराने ग्रासले आहे, त्यामुळे हे स्पष्ट होते की लिव्हरचा कर्करोग कोणालाही होऊ शकतो. पण अशी कोणती कारणं आहेत कारणं आहेत किंवा अशी कोणती लक्षणे असतील जी महिलांमध्ये लिव्हरच्या कर्करोगाचा धोका वाढतोय हे लक्षात येतं. ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दीपिकाचा पती शोएब इब्राहिम याने एका मुलाखतीत सांगितले की, दीपिका गेल्या काही महिन्यांपासून काही लक्षणे जाणवत होती अतिशय सामान्य वाटत होती. त्यामुळे त्याकडे सुरुवातीला ते किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर ही लक्षणे किती गंभीर आजाराचं आहेत हे समजल्यावर नक्कीच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण हेच जाणून घेणार आहोत की यकृताच्या कर्करोगाची सुरुवातीची काही लक्षणे काय असू शकतात. जी लक्षात आलीच वेळीच त्यावर उपचार करणे शक्य होईल.

Liver Cancerची सुरुवातीची लक्षणे

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

ओटीपोटात दुखणे किंवा अस्वस्थता

यकृताच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे ओटी पोटात दुखणे, पोटाच्या वरच्या उजव्या भागात, बरगड्यांच्या खाली सतत वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे. ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते आणि बहुतेकदा ती फक्त सामान्य पोटदुखी म्हणून दुर्लक्षित केली जाते. जर ही वेदना कायम राहिली किंवा कालांतराने वाढत गेली आणि सामान्य घरगुती उपायांनी ती कमी झाली नाही, तर ती गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

वजन कमी होणे

कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे हे यकृताच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या आहारात किंवा व्यायामाच्या दिनचर्येत कोणताही बदल न करता सतत वजन कमी होत असल्याचे दिसून आले तर ते तुमच्या शरीरात काही गंभीर बदलांचे लक्षण असू शकते. कर्करोगाच्या पेशी वेगाने वाढतात आणि शरीराची ऊर्जा वापरतात, ज्यामुळे वजन कमी होते . म्हणून, या लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका, विशेषतः जर ते थकवा किंवा भूक न लागणे यासारख्या इतर लक्षणांसह असेल.

भूक न लागणे

यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांना भूक न लागण्याचे देखील लक्षण जाणवतं. जरी त्यांनी खूप कमी अन्न खाल्ले असले तरी त्यांना लवकर पोट भरल्यासारखे वाटते. ही लक्षणे थेट यकृताच्या बिघडलेल्या कार्यामुळे उद्भवू शकतात, कारण यकृत पचन आणि चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावते. भूक न लागल्याने कुपोषण आणि अशक्तपणा देखील येऊ शकतो. जर तुमची भूक सतत कमी होत असेल, तर याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जात नसेल, तेव्हा हे यकृताच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण मानले जाऊ शकते . हा थकवा इतका तीव्र असू शकतो की त्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, व्यक्तीला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय असामान्य थकवा जाणवत असेल, तर ते गांभीर्याने घ्या आणि विलंब नकरता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गडद लघवी आणि हलक्या रंगाचे मल

यकृताच्या कर्करोगाचे आणखी एक लक्षण म्हणजे सामान्यपेक्षा जास्त गडद लघवी (चहाचा रंगासारखी). हे घडते कारण शरीर मूत्राद्वारे एक्स्ट्रा बिलीरुबिन बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. याउलट, मल हलका किंवा चिकणमाती रंगाचा होऊ शकतो कारण बिलीरुबिन, जो मलला सामान्य तपकिरी रंग देतो, तो यकृतातून आतड्यांमध्ये योग्यरित्या वाहून नेला जाऊ शकत नाही. ही दोन्ही लक्षणे कावीळसोबत किंवा त्याशिवायही उद्भवू शकतात आणि यकृताच्या कार्यात गंभीर समस्या दर्शवतात.त्यामुळे तेव्हाही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किडनी रॅकेटप्रकरणी डॉ. अजय तावरेला कोठडी किडनी रॅकेटप्रकरणी डॉ. अजय तावरेला कोठडी
रूबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेल्या ससूनचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला न्यायालयाने 2 जूनपर्यंत पोलीस...
ठाणे-घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्ग निविदेत गोलमाल; MMRDA ने सुप्रीम कोर्टाकडे मागितला एक दिवसाचा वेळ
Srujan 2025 : सस्टेनेबल इकोसिस्टमच्या निर्मितीसाठी एक दिवसीय परिसंवाद
Nanded News – पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू
मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत, विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची चर्चा
IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नऊ वर्षानंतर फायनलमध्ये धडक,पंजाब किंग्जचा केला दणदणीत पराभव
पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस