आंबा खाल्ल्याने शुगर वाढते का ? मधुमेह असलेल्या लोकांनी वाचायलाच हवे ‘हे’ स्पष्टीकरण
उन्हाळा आला की घाम, चिकटपणा आणि थकवा यामुळे अनेक लोक हैराण होतात. पण या उन्हाच्या दिवसांत निसर्ग आपल्याला एक खास भेट देतो तो म्हणजे फळांचा राजा ‘आंबा’. त्याचा सुगंध, गोडवा आणि चव मनाला प्रसन्न करणारी असते. मात्र काही लोक आंबा खाण्यापासून दूर राहतात, कारण त्यांना वाटतं की आंबा खाल्ल्याने वजन वाढेल किंवा मधुमेह बळावेल. पण यामागे खरी सायन्स काय आहे?
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. की “आंबा खाल्ल्याने लठ्ठपणा किंवा मधुमेह वाढतो, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.” उलट, आंबा हे नैसर्गिक फळ शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देतात.
तसंच न्यूट्रिशनिस्ट असंही स्पष्ट करतात की आंबा खाल्ल्याने मुरुमं होत नाहीत, आणि वजन वाढतं असंही नाही. “आज आपण अनेक वेलनेस प्रॉडक्ट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर शोधतो पण ते सगळं नैसर्गिकपणे आंब्यामध्ये आधीच असतं”
तसंच आंबा खाणं हे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही आवश्यक आहे. त्याचा गोडवा, रस आणि सुगंध मन प्रसन्न करतो. हा आनंद घेण्यापासून स्वतःला वंचित ठेवू नका. ताजं, स्थानिक आणि हंगामी फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी सर्वात चांगलं असतं, असं न्यूट्रिशनिस्ट नेहमी सांगतात.
मधुमेहींनी आंबा कसा आणि कधी खावा?
1. प्रमाण मर्यादित ठेवा : दिवसातून फक्त 1 छोटा आंबा (साधारण 100-150 ग्रॅम) खाणं योग्य आहे. मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते.
2. आंबा खाण्याची योग्य वेळ : आंबा दिवसाच्या पहिल्या भागात खाणं चांगलं असतं, विशेषतः दुपारी जेवणाआधी किंवा नंतर 2-3 तासांनी. रात्री आंबा टाळावा, कारण रात्री पचन क्रिया मंदावते.
3. पाण्यात भिजवून खा : आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा तास पाण्यात भिजवून मग खाल्ल्यास त्यातील उष्णता कमी होते आणि पचनास मदत होते.
4. इतर गोड पदार्थांपासून वाचवा : आंबा खाण्याच्या दिवशी इतर गोड पदार्थ, साखरयुक्त पेये किंवा फळं टाळावीत, जेणेकरून साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.
5. निरीक्षण ठेवा : आंबा खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी ब्लड शुगर लेव्हल तपासा, आणि तुमच्या शरीरावर होणारा परिणाम निरीक्षणात ठेवा. जर साखर स्थिर असेल, तर तुम्ही आंबा खाणं चालू ठेवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List