पेरू खा आणि डायबेटीज मुक्त व्हा, वाचा सविस्तर

पेरू खा आणि डायबेटीज मुक्त व्हा, वाचा सविस्तर

डायबेटीज असणाऱ्यांना आहाराचे नियम खूप कटाक्षाने पाळावे लागतात. आहारामधील बदल आणि चुकीचे खाणे डायबेटीज असणाऱ्यांसाठी भारी पडू शकते. बदलत्या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पेरूचा समावेश करू शकता. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.

पेरु खाण्याचे डायबेटीज रुग्णांसाठी फायदे

पेरूमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. यासोबतच ताण कमी करण्यासही हे उपयुक्त आहे. खराब जीवनशैली आणि आहारामुळे, लोकांना सर्दी आणि कफची समस्या असते. यामागे अॅलर्जी देखील असू शकते, परंतु यापासून मुक्त होणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही कफविरोधी गुणधर्म असलेल्या पेरूचे सेवन करू शकता.

कच्च्या लाल पेरूची खासियत म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवते.

पेरूच्या बिया गॅस आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक आढळतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पेरूमध्ये असलेले फायबर कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करू शकते. पेरूमध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते.

पेरू त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. असे म्हटले जाते की पेरू हे फायबरचे भांडार देखील आहे आणि हे फायबर बेड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सक्षम मानले जाते. विशेष म्हणजे हा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो.

पेरूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होईल असे समजा. अशावेळी पेरूचे सेवन नक्कीच करा.मॅग्नेशियम शरीरात योग्य प्रमाणात प्रवेश करत असल्यास स्नायूंना खूप आराम मिळतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुसलमानांवर माझे प्रेम आहे, मला दररोज पाकिस्तानमधून…; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा मुसलमानांवर माझे प्रेम आहे, मला दररोज पाकिस्तानमधून…; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
व्हर्जिन बायको शोधू नका.. ती एका रात्रीत संपते; प्रियांका चोप्राचे ते वक्तव्य चर्चेत
लग्न, नवऱ्याबद्दल विचारलं अन् थेट किस…; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मुंबईकरांना कराच्या बोझ्याखाली अडकवून ठेवणे, हेच भाजपचे तंत्र; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
AI शिका, नाहीतर नोकऱ्या जातील! सामनाने बनवला पहिला मराठी न्यूज अँकर… तेजस्वी AI देणार बातम्या
NEET PG Exam – नीट पीजी परीक्षा एका शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
शाकाहारी व्यक्तींनी आहारात उडदाच्या डाळीचा समावेश का करायला हवा, वाचा सविस्तर