किरकोळ भांडणातून कॅब चालकाला बोनेटवरून फरफटत नेले, मुंबई विमानतळावरील धक्कादायक घटना; व्हिडिओ व्हायरल

किरकोळ भांडणातून कॅब चालकाला बोनेटवरून फरफटत नेले, मुंबई विमानतळावरील धक्कादायक घटना; व्हिडिओ व्हायरल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ भांडणातून एका कॅब चालकाने दुसऱ्या चालकाला कारच्या बोनेटवर काही किमी अंतर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गाडी आणि चालक दोघांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई विमानतळावर बुधवारी मध्यरात्री भीमप्रसाद महंतो आणि जस्टिन जे या दोन कॅब चालकांमध्ये किरकोळ वाद झाला. यावेळी जस्टिन हा महंतो याच्या कॅबच्या बोनेटवर चढला. यानंतर महंतो कॅब सुरू केली आणि तो भरधाव वेगात वेस्टर्न एक्सप्रेस वे वर कॅब चालवत राहिला. यावेळी एका बाईकस्वाराने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. यावेळी जस्टिनच्या तक्रारीवरून पोलिसांनी बीएनएस कलम 281, 125, 126(2), 115(2), 352 आणि एमव्ही अ‍ॅक्ट कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. तसेच आरोपीला बीएनएसएसच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;