Mommy Makeover surgery: आई झाल्यानंतर अभिनेत्री करतात ब्रेस्ट अपलिफ्ट सर्जरी, तरुण दिसण्यासाठी काय-काय…

Mommy Makeover surgery: आई झाल्यानंतर अभिनेत्री करतात ब्रेस्ट अपलिफ्ट सर्जरी, तरुण दिसण्यासाठी काय-काय…

Cosmetic Surgeries: बॉलिवूडमध्ये हिरोचे वय कितीही असले तरी त्यांना तगडी फॅनफॉलोईंग असते, परंतू हिरोईनचं एकदा लग्न झाले की तिचे करीयर संपल्यात जमा होते. कारण आई झाल्यानंतर वजन वाढते आणि आपला स्क्रीनवरील एपिरियन्स चांगला वाटावा म्हणून अनेक अभिनेत्री आई झाल्यानंतर कॉस्मेटिक सर्जरीच्या मागे लागतात. आज आपण पाहणार आहोत तारे आणि तारका कोणत्या प्रकारच्या सर्जरी करीत असतात..

बॉलीवुड इंडस्ट्रीजमध्ये बॉडी सर्जरी करणे आता सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील लोकच नाहीत अनेक राजकारणी देखील स्वत:वर सर्जरी करुन आपले रुप खुलवणे आणि वय लपवण्याचे उद्योग करीत असतात. आता तर अभिनेते आणि अभिनेते खुले आमपणे आपण सर्जरी केल्याचे बिनधास्तपणे सांगत आहेत. कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर विक्रम सिंह राठोड यांनी यासंदर्भात माहीती देताना सांगितले आहे.

अभिनेत्री जास्त सर्जरी करतात…

सिद्धार्थ कनन यांच्या शोमध्ये डॉक्टर विक्रम राठोड यांनी बॉलीवुड एक्टर्स कॉस्मेटिक सर्जरी करण्यासंदर्भात माहीती दिली आहे. डॉक्टर राठोड यांनी सांगितले की पुरुषांच्या तुलनेत महिला अभिनेत्री प्लास्टीक सर्जरी करीत असतात. पडद्या आपण चांगले दिसावे आणि तरुण दिसावे यासाठी या सर्जरी केल्या जात असतात. काही जण अनेक सर्जिकल एन्हांसमेंट करतात. ज्यात फेस आणि बॉडी कंटूरिंग यांचा समावेश असतो.. खास करुन मुलाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री या सर्जरी करतात असे त्यांनी सांगितले.ॉ

तरुण दिसण्यासाठी अट्टाहास –

त्या त्यांच्या चेहऱ्यावरील डाग आणि डाग सर्कल लपविण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरी करीत असतात. चेहऱ्याची स्कीन टाईट करीत असतात. डबल चिन नीट करवून घेतात. अभिनेत्री ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीची रिक्वेस्ट देखील करीत असतात. त्या रायनोप्लास्टी ( नाकाची सर्जरी ) करीत असतात. ब्लेफेरोप्लास्टी ( पापण्यांची सर्जरी ) करीत असतात. म्हणजे तरुण दिसण्यासाठी त्या या सर्व सर्जरी करीत असतात.

ट्रेंडमध्ये मॉमी मेकओव्हर

याशिवाय मम्मी मेकओव्हर संदर्भात देखील त्यांनी माहीती दिली. ते म्हणाले की मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्री त्यांच्या शरीरांसदर्भात कॉन्शस होतात आणि डिप्रेशनमध्ये जातात मग त्या सर्जरीच्या मागे लागतात.आजकाल हा ट्रेंड खूप चालला आहे. आज मम्मी मेकओव्हर ट्रेंड जगभरात सुरु आहे. कारण प्रेग्नन्सी नंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोन्स बदल होतात. त्यांना असे वाटते की आपण जर चांगले दिसलो नाही तर आपण करीयर खराब होईल. त्यामुळे त्या डिप्रेशनमध्येही जात असतात. त्यातून बाहेर येण्यासाठी त्या मम्मी मेक ओव्हर करतात. त्या ब्रेस्ट अपलिफ्ट, टमी टक आणि लिपोसक्शन करतात असे ही त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? ‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज...
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा
विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी फटकारले
एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक
मराठमोळ्या अभिनेत्याला दिग्दर्शकाने रोल देण्यास दिला नकार, म्हणाला ‘मी तुझ्या समोर नागडा…’