न्यायमूर्ती अतुल चांदुरकर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनणार; केंद्र सरकारने दिली मंजुरी

न्यायमूर्ती अतुल चांदुरकर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनणार; केंद्र सरकारने दिली मंजुरी

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. न्यायमूर्ती चांदूरकर हे निवृत्तीपर्यंत म्हणजेच 6 एप्रिल 2030 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करतील. सर्वोच्च न्यायालयात उद्या तीनही नवीन न्यायाधीश शपथ ग्रहण करणार आहेत.

देशाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 26 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती चांदुरकर यांच्यासह कर्नाटक आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही अंजारिया आणि विजय बिश्नोई यांच्या नियुक्तीची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने ही अधिसूचना जारी केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ओक हे 24 मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर दोन दिवसांनी कॉलेजियमने ही शिफारस केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;