प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी ‘हे’ फळ आहे खूप महत्त्वाचे

प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी ‘हे’ फळ आहे खूप महत्त्वाचे

संत्रे असे एक महत्त्वाचे फळ ज्यामध्ये खूप सारे गुणकारी तत्वं आहेत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरभरून मात्रेमध्ये असते. म्हणूनच संत्रे खाण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. संत्र्याच्या सेवनामुळे केवळ इतकेच नाही तर, खूप सारे फायदे आपल्याला मिळतात. संत्र्याच्या सेवनाने कोणकोणते फायदे आपल्याला मिळतील ते बघूया. संत्र्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे, शरीरावर येणारी सूज संत्र्याच्या सेवनामुळे दूर होते. संत्र्यामध्ये अॅंटीइफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे, सूज कमी होण्यास अधिक मदत होते. विषाणूंना रोखून ठेवण्याची शक्ती संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात असते. त्यामुळे आपण आजारांशी लढण्यास समर्थ होतो.

संत्र्यामध्ये असणाऱ्या फ्लेवोनाॅयड आणि केरीटोनाॅयड या तत्वांमुळे कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पेशींना रोखण्यास मदत होते.

संत्र्यात मुबलक प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

रोज एक संत्रे खाल्ल्यामुळे हाडांच्या दुखण्यामुळे येणारी सूज तसेच संधीवात यासारख्या आजारांवर मात करता येते.

संत्र्यामध्ये बी-6 मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. तसेच त्या जोडीला उच्च रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते.

मधुमेहींसाठी सुद्धा संत्रे हे खूप गुणकारी मानले जाते. संत्र्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे, मधुमेही संत्रे न घाबरता खाऊ शकतात.

संत्र्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स आणि प्रथिने असल्यामुळे, प्रतिकारशक्ती मजबूत राहते.

संत्री नियमित सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;