आपल्या आहारात पनीर का असायला हवे, वाचा

आपल्या आहारात पनीर का असायला हवे, वाचा

पनीर हे निरोगी आरोग्यासाठी खूपच गरजेचे आहे. पनीरमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे आपल्याला खूप सारे आरोग्य फायदे मिळतात. सध्याच्या घडीला अनेकांमध्ये डाएट करण्याचे फॅड खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. डाएटमुळे आपल्या शरीराला अनेक पदार्थांची गरज असते ते मात्र मिळत नाही. त्यामुळे अनेकदा अशक्तपणा येतो. आहारात पनीरसारखा पदार्थ समाविष्ट केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

पनीर खाण्याचे फायदे

पनीर खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते.

पनीरमध्ये आढळणारे लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांमुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

 

पनीरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन डी मुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्राॅल आणि उच्च रक्तदाब सामान्य राहतो. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी हा पनीर हा सर्वोत्तम आहार आहे.

 

पनीरमध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, फोलेट सारखे पोषक घटक गर्भवती महिला आणि जन्माला येणारे बाळ निरोगी राहते.

निरोगी राहण्यासाठी, आपल्याला निरोगी नाश्ता करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला नाश्त्यामध्ये तळलेले पदार्थ टाळायचे असतील तर, तुमच्यासाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे.

पनीर हा उच्च प्रथिनयुक्त आहार आहे. म्हणून, नाश्त्यामध्ये कॉटेज चीज खाल्ल्याने, म्हणजेच पनीर खाल्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवेल. पनीर खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही, कारण ते पचायला बराच वेळ लागतो.

(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;