आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, ‘मातोश्री’वर उद्या दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, ‘मातोश्री’वर उद्या दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल आभार मानतानाच, शुक्रवारी वाढदिवशी दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत आपण ‘मातोश्री’ निवासस्थानी तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी शिवसैनिक आणि युवासैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’ येथे येतात. या शिवसैनिकांसाठी आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. ‘आपणा सर्वांना भेटण्यासाठी आणि आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी शुक्रवारी दुपारी 1 ते 5 या वेळेत ‘मातोश्री’ येथे उपलब्ध असेन’, असे त्यांनी सांगितले.

हे प्रेम आणि आशीर्वाद सदैव राहू द्या!

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यात रक्तदान शिबीर, शालेय मुलांना वह्यावाटप, विद्यार्थी गुणगौरव, अन्नदान, रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. ‘आपले हे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असावेत’, अशा भावना व्यक्त करत या सामाजिक उपक्रमांबद्दल आदित्य ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;