रोह्याचा दानियाल कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीयर; ए 320 ते एटीआर 72 विमानांवर करणार अधिकृत स्वाक्षरी

रोह्याचा दानियाल कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीयर; ए 320 ते एटीआर 72 विमानांवर करणार अधिकृत स्वाक्षरी

रोह्याचा दानियाल चोगले याने एव्हिएशन क्षेत्रात गगनभरारी घेत यश मिळवले आहे. ए ३२० ते एटीआर ७२ या दोन्ही विमानांवर अधिकृत स्वाक्षरी करणारे अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली असून दानियाल कोकणातील पहिले एअरक्राफ्ट इंजिनियर ठरले आहेत. या यशाबद्दल दानियाल चोगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दानियालचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण रोह्यातील जे.एम. राठी स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर पुण्याच्या हिंदुस्थान एरोस्पेस अॅण्ड इंजिनीयरिंग कॉलेजमधून एअरक्राफ्ट इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. दानियालचा व्यावसायिक प्रवास विस्तार एअरलाईन्स या कंपनीतून सुरू झाला. तिथे साडेतीन वर्षे सेवा दिल्यानंतर अनुभवाच्या जोरावर त्यांनी नावाजलेल्या इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या सेवेत रुजू झाले. इंडिगो एअरलाईन्स या कंपनीने दानियालला अॅडवान्स्ड एअरबस ए ३२० आणि एटीआर ७२ विमानांची तांत्रिक जबाबदारी दिली आहे. दानियालची गगनभरारी तरुणांसाठी एक प्रेरणा असून मोठी स्वप्नं उराशी बाळगून अहोरात्र मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

माझा जन्म रोह्यासारख्या छोट्याशा गावात झाला आहे. माझे आई-वडील आणि रोहेकर जनतेच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळाले आहे. कुटुंबीयांनी दिलेली साथ माझ्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि काम करण्यासाठी नवीन उमेद देत असते.
– दानियाल चोगले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;