महाराष्ट्रातही ‘सोनम रघुवंशी’! वटपौर्णिमेदिवशीच नवविवाहितेने नवऱ्याला संपवले
अवघ्या 17 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपेत असलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनिल तानाजी लोखंडे (वय 50) असे मृत पतीचे नाव आहे. सांगलीतील एकतानगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे (वय 27) हिला अटक केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे याच्याशी लग्न झालं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता. यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱहाडीने घाव घालत हत्या केली.
अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्याने 17 दिवसांपूर्वीच अनिल लोखंडे याचे राधिकाशी लग्न झाले होते. पतीच्या हत्येप्रकरणी राधिका इंगळे हिला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List