धारावीच्या आडून लूट! अदानीला आणखी 13 लाख चौरस फूट टीडीआर देण्याचा घाट

धारावीच्या आडून लूट! अदानीला आणखी 13 लाख चौरस फूट टीडीआर देण्याचा घाट

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून राज्य सरकार आणि अदानीचे मुंबई लुटण्याचे षड्यंत्र सुरूच असून आता त्यात नवा अध्याय जोडला गेला आहे. धारावीतील शताब्दीनगरमधील झोपडीधारकांची 1,332 घरे म्हाडाने पाच वर्षांपूर्वी बांधली, मात्र अदानीच्या सांगण्यावरून रहिवाशांना अजूनही ताबा देलेला नाही. या बांधलेल्या घरांचा खर्च म्हाडाला द्यायला अदानी तयार झाला आहे. मात्र त्यावर असलेले व्याज माफ करावे नाहीतर सरकारने 13.39 लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र (सेल इन्सेंटिव्ह एरिया) टीडीआर स्वरूपात द्यावे, अशी मागणी केली आहे. ही मागणी भाजप सरकार मान्य करणार आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

अदानी आणि राज्य सरकारडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन सुरू असलेल्या खुल्या लुटमारीबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी पुन्हा जोरदार आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या, म्हाडाने धारावीकरांतील शताब्दीनगरमध्ये पाच वर्षांपूर्वी झोपडीधारकांसाठी घरे बांधली होती. 2018 पर्यंत म्हाडाने पात्रतेचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्प लाभार्थी निश्चित करून तीन पुनर्वसन इमारती पूर्ण केल्या आणि इतर दोन इमारतींचे बांधकाम 2020 मध्ये पूर्ण केले.

म्हाडा हे बांधकाम पूर्ण करून बांधकाम खर्चावर डीआरपीएला हस्तांतरित करणार आणि डीआरपीए त्या लाभार्थ्यांना तत्काळ घरे देणार असे अपेक्षित होते. मात्र तसे न करता अदानीने धारावी 2022 मध्ये धारावी प्रकल्पाची निविदा जिंकल्यानंतर सरकार आणि डीआरपीएने या इमारतींचे हस्तांतरण थांबवले.

भाजप, अदानीचे नाटक

म्हाडाने ही घरे आणि जमिनीचा ताबा देण्याच्या बदल्यात डीआरपीएकडे व्याजासकट 665 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण सरकारने किंवा डीआरपीएने हे पैसे स्वतः न भरता ठरल्याप्रमाणे चेंडू अदानीकडे वळवला. अदानीने व्याजाचे पैसे न देण्याचे नाटक करत सरेंडर सरकारकडे दाद मागितली आणि लगेचच 13.39 लाख चौरस फूट टीडीआरची मागणी केली, असा आरोप त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;