गोव्यातील प्रवास होणार सुरक्षित, ‘बॉडी’ टॅक्सी अ‍ॅपची सुरुवात

गोव्यातील प्रवास होणार सुरक्षित, ‘बॉडी’ टॅक्सी अ‍ॅपची सुरुवात

गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक रघू शेटिया यांनी ‘बॉंडी’ या टॅक्सी अ‍ॅपची घोषणा केली आहे. गोव्यातील वाढत्या वाहतूक गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप पर्यटकांचा गोव्यातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करणार आहे.

स्थानिक रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार असून, पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये येणाऱ्या अडचणींचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

बॉंडीचे संस्थापक रघू शेटिया म्हणाले, “गोव्यातील प्रवासाची पद्धत बदलणे हाच आमचा उद्देश आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक दर्जेदार, सुरक्षित व आरामदायक बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

गोव्यातील बदलत्या पर्यटन आणि वाहतूक गरजांसाठी बॉंडी हे अ‍ॅप प्रभावी ठरण्याची अपेक्षा असून, लवकरच हे अ‍ॅप राज्यभरात लाँच केले जाण्याची शक्यता आङे. .

प्रवाशांसाठी ‘बॉंडी’ अ‍ॅप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, त्याद्वारे प्रवास अधिक सोपा, पारदर्शक आणि नियोजित होणार आहे. गोव्यात प्रवासाचे भविष्य अनुभवण्यासाठी आजच बॉंडी अ‍ॅप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा