बँकांमध्ये 78 हजार 213 कोटी रुपये पडून!

बँकांमध्ये 78 हजार 213 कोटी रुपये पडून!

देशभरातील बँकांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी पडून आहेत. या पैशांवर आजतागायत कुणी दावा केलेला नाही. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक रेग्युलेटर्स आणि बँकिंग विभागाला पैसे कुणाचे आहेत, याची माहिती घेण्यास सांगितले. सामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन ज्यांचे हे पैसे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने पावले उचलण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत दावा न केलेले पैसे त्यांच्या मालकाला परत देण्यास आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. बँकेत पडून पैशांचा शोध घेण्यासाठी आणि ते त्यांच्या मालकांना परत देण्यासाठी सरकार एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रत्येक जिह्यात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. ही मोहीम केवळ बँकांपुरती मर्यादित नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी (शेअर बाजाराचे नियामक), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, पेन्शन फंड नियामक आणि विमा नियामक यांच्या समन्वयाने चालवली जाईल. याचा अर्थ केवळ बँकांमधील ठेवीच नव्हे, तर दावा न केलेले शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसीचे पैसे आणि पेन्शन फंड यांचाही यात समावेश आहे.

बँकांमध्ये किती पैसे पडून?

आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत बँकांमध्ये तब्बल 78,213 कोटी रुपये असेच पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही. यामध्ये मागील वर्षभरात 26 टक्के वाढ झाली आहे.

केवायसी प्रक्रिया होणार सोपी

नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अर्थमंत्र्यांनी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष भर दिला आहे. विशेषतः परदेशात राहणाऱया नागरिकांसाठी (एनआरआय) शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणि इतर आर्थिक व्यवहार करणे सोपे व्हावे यासाठी डिजिटल लिंकिंगसह केवायसी नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;