बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

खेळण्या-बागडण्याच्या, शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या वयात लहानगे मजुरीच्या दलदलीत फसल्याचे सर्रास बघायला मिळतात. कामगार व पोलीस विभागाकडून बालकामगारांविरोधात वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. परंतु त्या म्हणाव्या तितक्या प्रभावी नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. याला जनतादेखील तितकीच जबाबदार असून बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात.

जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त कामगार व पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा आढावा घेतला असता आजही बालकांना मंजुरीसाठी जुंपले जात असल्याचे भयानक वास्तव पाहायला मिळते. राज्यातील सर्व जिह्यांमध्ये जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कृती दलांनी सन 2023 पासून मार्च 2025 पर्यंत विविध ठिकाणी 603 धाडी टाकल्या. या कारवाईत 151 बालकामगार व 186 किशोरवयीन कामगारांची सुटका करण्यात आली. तसेच मुलांना मजुरीला जुंपल्याप्रकरणी 208 आस्थापना मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 148 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्या कारवाईत 85 बालकामगारांची सुटका करण्यात आली, तर 80 मालकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने जानेवारी ते जून या कालावधीत 40 बालकामगारांची सुटका करून 17 गुह्यांची नोंद केली व 19 आरोपींना बेडय़ा ठोकल्या. बालकामगारांविरोधात नागरिकांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. बालकामगार दिसल्यास तत्काळ त्याची तक्रार पोलीस अथवा कामगार विभागाकडे करावी, असे आवाहन दोन्ही विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;