पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?

पिंपरी चिंचवड महापालिकेची 2017 ची चार सदस्यीय पध्दतीची प्रभाग रचना तयार आहे. आगामी निवडणूक याच पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल केले जातील. प्रभाग रचना कायम राहण्याची शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी सांगितली. त्याचबरोबर एका प्रभागात 49 ते 59 हजार लोकसंख्या असण्याचीही शक्यता आहे.

महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी मुदत 13 मार्च 2022 रोजी संपली. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती. राज्य शासनाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीही आढावा घेतला.

त्यानंतर पालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. प्रभाग रचनेबाबत चर्चा झाली. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत 17 लाख लोकसंख्येला महापालिकेत 128 नगरसेवक आणि 32 प्रभाग होते. त्याप्रमाणे यावेळीही 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक असणार आहेत.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांचा समावेश करावा, असे आदेशात नमूद केले आहे.

प्रभाग रचनेची अशी होणार प्रक्रिया महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यासाठी वेळ, मर्यादा निश्चित करण्याबाबतचा आयोगाचा एक-दोन दिवसांत आदेश येईल. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना करण्यात येणार असून एका प्रभागात 49 ते 59 हजार लोकसंख्या असण्याची शक्यता आहे.

अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका मान्यतेसाठी पालिका आयुक्तांनी सादर करावी. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असणार आहे. प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी प्रसिध्द करावी. त्या प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर राज्य सरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकारीमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी आयुक्तांना सादर कराव्या लागणार. राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देईल.

2017 मधील पक्षीय बलाबल

भाजप – 77
राष्ट्रवादी काँग्रेस – 36
शिवसेना – 9
मनसे – 1
अपक्ष – 6

प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपणार?

2017 च्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना भाजपने त्यांच्या कलानुसार आणि सोयीने प्रभागरचना केली होती. यामध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, गल्ल्यांसह आदींची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यामुळे त्या प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या. मात्र, या हरकती आणि सूचनांना निवडणूक विभागाने केराची टोपली दाखवली. या वेळी प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला