बार डान्सरला नाचायला उचकवणाऱ्यांचा गुन्हा रद्द, हायकोर्टाने पुरावा नसल्याचा ठेवला ठेपका

बार डान्सरला नाचायला उचकवणाऱ्यांचा गुन्हा रद्द,  हायकोर्टाने पुरावा नसल्याचा ठेवला ठेपका

बारमध्ये बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे उचकवले गेले याचा पुरावा नसल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने चार ग्राहकांचा गुन्हा रद्द केला.

मोहित माकड व अन्य तिघांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. न्या. नितीन सांबरे व न्या. सचिन देशमुख यांच्या  खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. माकड व त्याचे सहकारी बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे उचकवत होते याची साक्ष एकाही साक्षीदाराने दिलेली नाही. पुराव्यांअभावी याचिकाकर्त्यांविरोधात खटला चालवता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका मंजूर केली.

काय आहे प्रकरण

बांगूर नगर पोलिसांनी 2017मध्ये एका डान्स बारवर धाड टाकली. माकड व त्याचे सहकारी तेव्हा बारमध्ये होते. बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी ते भडकवत होते, असा पोलिसांचा आरोप होता. याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. आम्ही आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे बार डान्सरला उचकवत होतो, अशी साक्ष कोणीही दिलेली नाही. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

पोलिसांचा विरोध

ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावावी. कारण याचिकाकर्ते दोषमुक्तीसाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून गुन्हा रद्द करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी केला होता.

न्यायालयाचे निरीक्षण

याचिकाकर्ते बार डान्सरला नाचण्यासाठी उचकवत होते, असा दावा साक्षीदारांनी केला आहे. पण कशा प्रकारे उचकवले जात होते याचा तपशील कोणाच्याच साक्षीत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;