ओडिशामध्ये जगन्नाथपुरी मंदिराच्या पुजाऱ्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

ओडिशामध्ये जगन्नाथपुरी मंदिराच्या पुजाऱ्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील पुजारी जगन्नाथ दीक्षित यांची हत्या करण्यात आली आहे. ते मंदिरात मुख्य पुजारी म्हणून काम पाहत असे. पुजाऱ्याच्या हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती पुजाऱ्याचा मृतदेह दाराबाहेर फेकताना दिसत आहे. पुजाऱ्याचा मृतदेह पतजोशीच्या घरासमोर रक्ताने माखलेला आढळला. त्यामुळेच सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून, कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज समोर आले आहे. यामध्ये एक माणूस दीक्षितचा मृतदेह फेकताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीक्षितचा मृतदेह फेकताना दिसणारा व्यक्ती पतजोशी असल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्याने मंदिरातील पुजाऱ्याला मारले कारण त्याने त्याचे पैसे परत मागितले होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात असताना दिवसाढवळ्या वरिष्ठ पुजाऱ्याची हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पुरी शहराचे डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) प्रशांत कुमार साहू यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आयआयसीसह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. एक वैज्ञानिक पथकही घटनास्थळी पोहोचले आणि तपासणीसाठी नमुने गोळा केले. तर दीक्षित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (DHH) पाठवण्यात आला.

या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना पुरीचे एसपी विनीत अग्रवाल म्हणाले की, ही हत्या वैयक्तिक शत्रुत्वातून झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज गोळा करून ते तपास प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे खरे कारण समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;