Meghalaya honeymoon murder – सोनमनं राजाला संपवण्यासाठी निवडला ‘गुवाहाटी’चा मार्ग, कामाख्या मंदिराला भेट देण्याची घातली होती अट

Meghalaya honeymoon murder –  सोनमनं राजाला संपवण्यासाठी निवडला ‘गुवाहाटी’चा मार्ग, कामाख्या मंदिराला भेट देण्याची घातली होती अट

मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हनीमूनसाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशी याची त्याची पत्नी आणि कथित प्रियकराने ‘कॉन्ट्रॅक्ट किलर्स’च्या मदतीने निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजा रघुवंशीची पत्नी सोमन, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. सोनम हिने पतीच्या हत्येच्या षडयंत्रात सहभागी असल्याचीही कबुली दिली आहे. या प्रकरणात रोज चक्रावून टाकणारे नवनवीन खुलासे होत आहेत.

सोनम हिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लग्नामध्ये ती खूश दिसत नव्हती. तिच्याच वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राज कुशवाह याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. परंतु याची चाहूल लागल्याने तिच्या कुटुंबियांनी घाईघाईने तिचे राजासोबत लग्न लावून दिले होते. याचा राग आल्याने सोनमने प्रियकराच्या मदतीने राजाचा काटा काढण्याचे ठरवले. सोनम हनीमूनच्या बहाण्याने राजा रघुवंशी याला मेघालयला घेऊन गेली. ती त्याला जवळही येऊ देत नव्हती. एवढेच नव्हे तर शरीरसंबंध ठेवण्याआधी तिने राजासमोर एक अटही घातली होती.

सोमन आणि राजा यांचे 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले. लग्नानंतर सोनम चार दिवस सासरी राहिली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. यावेळी तिने राजला मेसेज करून मला पतीजवळ राहणे आवडत नाही असे सांगितले. एवढेच नाही तर  राजाने जवळीक साधू नये यासाठी त्याला एक अट घातली होती. गुवाहाटीतील कामाख्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर शारीरिक संबंध ठेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात करेल, अशी अट सोनमने घातली होती. त्यामुळे राजाने गुवाहाटी आणि मेघालयला जाण्याचा प्लॅन केला. तर दुसरीकडे सोनमने मेघालयच्या जंगलामध्ये नेऊन राजाला मारण्याचा कट रचला, असेही पोलीस तपासात उघड झाले आहे.

राजा आणि सोनम रघुवंशी गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. 23 मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीमध्ये सापडला. तर तिथून जवळपास 1200 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सोनम हिने पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तीन कॉन्ट्रॅक्ट किलरलाही बेड्या ठोकल्या. पोलीस चौकशीदरम्यान सोनमसह सर्वच आरोपींनी गुन्हा कबूल केला.

Raja Raghuvanshi Case – राजाचा काटा काढायचाच होता; ‘प्लॅन-ए’ फेल झाला असता तर ‘प्लॅन-बी’ होता तयार, धक्कादायक खुलासा

पोलीस अधिकारी विवेक सायम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कॉन्ट्रॅक्ट किलर 21 मे रोजी गुवाहाटीला पोहोचले होते. तिथे ते एका लॉजवर राहिले आणि त्यानंतर शिलाँगच्या दिशेने निघाले. शिलाँगला गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट किलरने सोनम समोरच राजा रघुवंशी याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत ढकलून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;