तरुणांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढतेय! मोदींच्या चाहत्यांची संख्या घटतेय

तरुणांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढतेय! मोदींच्या चाहत्यांची संख्या घटतेय

बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या एक सर्वेक्षणात तरुणांमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय नेते म्हणून 47 टक्के युवकांनी राहुल गांधी तर 39 टक्के युवकांनी मोदींच्या नावाला पसंती दर्शविली आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी थेट लढत होईल. जेडीयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीए या निवडणुकीला सामोरी जाणार असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले बिहारमधील राजकीय दौरे वाढवले आहेत. त्यापाठोपाठ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेही मागील काही दिवसांपासून राज्यातील दौरे वाढले आहेत. त्यातच ‘पोल ट्रकर ओपिनियन पोल’ची आकडेवारी समोर आली असून यामध्ये बिहारमधील युवकांनी राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हणून सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.

नितीशकुमार दलबदलू

2020च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी भाजपसोबत निवडणूक लढवून सत्तेत आले. कमी जागा जिंकूनही त्यांनी मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. 2022 मध्ये भाजपची साथ सोडून त्यांनी आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर लोकसभेच्या तोंडावर जानेवारी 2024 मध्ये इंडिया आघाडीची साथ सोडून ते पुन्हा भाजपसोबत सत्तेत गेले. त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे नितीशकुमार यांची दलबदलू नेता अशी प्रतिमा निर्माण निर्माण झाली असून एनडीएला त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रशांत किशोर यांच्यामुळे गणित बिघडणार

आतापर्यंत इतर पक्षांसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून भूमिका पार पाडणारे प्रशांत किशोर जनसुराज पार्टीच्या माध्यमातून विधानसभेच्या लढाईत प्रत्यक्ष उतरणार आहेत. तिसरा पर्याय म्हणून पुढे येत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाला लोक किती साथ देतात हे निवडणुकीच्या निकालातूनच दिसून येईल. मात्र त्यांच्या राजकारणामुळे सत्ताधारी एनडीएसह इंडिया आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

काँग्रेस निर्णायक भूमिकेत

बिहारच्या युवकांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहकार्याच्या नव्हे तर निर्णायक भूमिकेत दिसू शकते. राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेचा कॉँग्रेसला निश्चितच फायदा होईल असा अंदाज आहे.

– ‘पोल ट्रकर’च्या सर्वेक्षणात तुमचा आवडता राष्ट्रीय नेता कोणता असा प्रश्न युवकांना विचारला होता. त्यावर 47 टक्के युवकांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 39 टक्के युवकांनी पसंती दर्शवली. 14 टक्के युवकांनी अन्य नावांना पसंती दर्शविली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल