मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर सरकारची दडपशाही; पोलिसांच्या धक्काबुक्कीत महिला बेशुद्ध, कपडे फाटले

मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर सरकारची दडपशाही; पोलिसांच्या धक्काबुक्कीत महिला बेशुद्ध, कपडे फाटले

शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर आज महायुती सरकारच्या पोलिसांनी जुलूम केले. आंदोलनकर्त्यांना पकडण्याच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत आंदोलक महिलांचे कपडे फाटले गेले तसेच एक महिला चक्कर येऊन कोसळली. त्यानंतरही पोलिसांनी दयामाया न दाखवता जबरदस्ती गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले, असा आरोप आंदोलकांनी केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून संघटनेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. आज दुपारी 2 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पार्टी आणि त्याच अंतर्गत कार्य करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या’, ‘शेतमालाला हमीभाव द्या’, ‘दिव्यांग व विधवा महिलांना मासिक सहा हजार रुपये मानधन द्या’, ‘ग्रामीण भागांतील घरकुल योजना लाभार्थ्यांना पाच लाख रुपये अनुदान द्या’ अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या तसेच इतर विविध मागण्यांचे फलकही झळकावले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिसांनी पक्षाचे प्रवक्ते अॅड. मनोज टेकाडे व अन्य पदाधिकाऱयांना ताब्यात घेतले.

दडपशाहीचा तीव्र निषेध

लोकशाहीनेच आंदोलनाचा अधिकार दिला आहे. परंतु आमचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केली. पोलिसांनी निष्काळजीपणे आंदोलन हाताळल्याने एका दिव्यांग आंदोलक महिलेचे कपडे फाटले गेले तर अन्य एक महिला बेशुद्ध पडली. सरकार आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो. z अॅड. मनोज टेकाडे, प्रवक्ते, प्रहार जनशक्ती पार्टी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;