शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव, लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव, लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना लावणी कलावंत महासंघ, मुंबई या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 24 जून रोजी संस्थेच्या 11 वा वर्धापनदिनी आयोजित सोहळय़ात मधुकर खामकर यांना पुरस्कार प्रदान केला जाईल. हा कार्यक्रम  श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिर, दादर येथे सायंकाळी 5 वाजता  होईल.

संस्थेच्या वर्धापन दिन सोहळय़ात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगावकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनील ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना ‘लावणी गौरव 2025’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचाही सन्मान करण्यात येईल. या सोहळय़ात नामवंत कलाकारांचा नृत्याविष्कार सादर होईल, अशी माहिती अध्यक्षा कविता घडशी यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;