बकरा मंडीत विद्यार्थ्याची बनवाबनवी, बनावट स्क्रीनशॉट दाखवून बकरा घेऊन गेला

बकरा मंडीत विद्यार्थ्याची बनवाबनवी, बनावट स्क्रीनशॉट दाखवून बकरा घेऊन गेला

मालाडमध्ये राहणाऱया एका विद्यार्थ्याने घासाघीस करून 30 हजारांत देवनार मंडईत राजस्थानमधील एका व्यापाऱयाकडून बकरा विकत घेतला आणि पैसे ऑनलाईन पाठविल्याचा स्क्रीनशॉट तयार करून व्यापाऱयांची फसवणूक केली. देवनार पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

राजस्थानचे असलेले बिरजू चितोडीया व त्याची आई रामुबाई चितोडीया हे दोघे त्यांचे सात ते आठ बकरे विकण्यासाठी देवनार मंडीत आले होते. जास्त पैसे मिळतील या आशेवर ते होते. दरम्यान मालाडमध्ये राहणारा व बीएस्सी फार्माच्या दुसऱया वर्षाला शिकणारा तरुण 4 तारखेला मंडीत गेला. त्याने बरीच घासाघीस करून चितोडीया यांच्याकडून 30 हजार 200 रुपयांत बकरा खरेदी केला. त्यानंतर त्याने बनावट स्क्रीनशॉट तयार करणाऱया अॅपचा वापर करून 30 हजार 200 रुपये ऑनलाईन पाठविल्याचा स्क्रीनशॉट तयार करून तो व्यापाऱयास दाखविला. नेटवर्क कमी आहे, पैसे थोडय़ा वेळात येतील असे सांगून तो बकरा घेऊन निघून गेला. पण 24 तास उलटूनही पैसे न आल्याने बिरजूने बँकेत जाऊन विचारपूस केली. तेव्हा तुमच्या खात्यात रक्कम आलेली नाही असे बँकेत त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी देवनार पोलिसांत तक्रार दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;