नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, हगवणेंच्या वकीलाचा अजब युक्तीवाद
वैष्णवी हगवणे प्रकरणात आज पुण्यातील शिवाजी नगर कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी हगवणे यांच्या वकिलाने न्यायालयात धक्कादायक दावे केले आहेत. त्याने वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते व ते हगवणे कुटुंबियांनी पकडले होते असा दावा केला आहे. तसेच एखाद्या पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हा छळ नसल्याचा दावा देखील केला आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शिवाजीनगर कोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची तर सासरे राजेंद्र व दीर सुशील यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी झालेल्या युक्तीवादात हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिना यांनी वैष्णवीबाबत धक्कादायक दावे केले. ”वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते. ते आम्ही पकडले होते. वैष्णवीची प्रवृतीच आत्महत्या करणारी होती. तिने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता”, असे वकील विपुल दुशिना यांनी न्यायालयात सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List