22 जूनपासून अमेरिकेत धावणार ड्रायव्हरविना टॅक्सी, एलॉन मस्क यांनी जाहीर केली रोबोटॅक्सीची तारीख

22 जूनपासून अमेरिकेत धावणार ड्रायव्हरविना टॅक्सी, एलॉन मस्क यांनी जाहीर केली रोबोटॅक्सीची तारीख

अनेक वर्षांपासूनची रोबोटॅक्सीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क येत्या 22 जून रोजी टेक्सासच्या ऑस्टिन येथे रोबोटॅक्सीची सेवा सुरू करणार आहेत. एलॉन मस्क यांनी ‘एक्स’वर याबाबतची माहिती दिली. एलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार रोबोटॅक्सीला ऑस्टिनमध्ये सर्वात आधी लाँच केले जाईल. व्हिडीओमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय गर्दीच्या रस्त्यावरून रोबोटॅक्सी धावताना दिसली. अर्थात त्या वेळी ड्राईव्हलेस टेस्टिंग मॉडेल कारच्या मागे टेस्लाची एक कार देखरेख ठेवून होती. रोबोटॅक्सी आल्यानंतर लोकांच्या सुरक्षेचे काय, अशी चिंता व्यक्त होतेय. कारण अलीकडे टेस्लाच्या ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कारचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

कशी आहे रोबोटॅक्सी

रोबोटॅक्सी स्वयंचलित टॅक्सी आहे. त्याला स्टिअरिंग व्हिल किंवा पैडल नाही. याचे डिझाईन खूप वेगळे आहे. सुरुवातीला रोबोटॅक्सीची सर्व्हिस ऑस्टिनमध्ये सुरू होईल. तिथे सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर अन्य शहरांमध्ये रोबोटॅक्सी धावेल. स्वयंचलित कारच्या सुरक्षेबद्दल सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येते. मात्र एलॉन मस्क यांचा दावा आहे की, ऑटोनॉमस कार या साधारण कारपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक सुरक्षित असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;