दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन

महाराष्ट्र पॅरालिम्पिक चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेला उपस्थिती; खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्याची ग्वाही

दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन

पिंपरी : दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रमाला नगरसेविका अश्विनी संजय वाबळे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी अश्विनी वाबळे यांनी उपस्थित दिव्यांग खेळाडूंशी संवाद साधला. खेळाप्रती असलेली त्यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले. दिव्यांग खेळाडू अनेक अडचणींवर मात करून क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांना समाजाने प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

क्रीडा क्षेत्रात वाटचाल करताना दिव्यांग खेळाडूंना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या समस्या आणि गरजा जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. तसेच खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही अश्विनी वाबळे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, मार्गदर्शक मानवजी कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग खेळाडूंमध्ये अफाट इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाची क्षमता आहे. त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. त्यांच्या जिद्दीला बळ देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करणे ही समाजाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन
पिंपरी : दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे...
दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोडीची कार्यवाही तात्काळ स्थगित करा
पिंपळे सौदागरमध्ये ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार
निगडीतील वाहतूक कोंडीवरून सुलभा उबाळे आक्रमक
बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट
लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध
एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध