दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा; प्रलंबित कामांना गती देण्यासाठी नियोजन
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात संबंधित पातळीवर सकारात्मक चर्चा करून कामांच्या पुढील नियोजनावर भर देण्यात आला.
पिंपरी- : दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात संबंधित पातळीवर सकारात्मक चर्चा करून कामांच्या पुढील नियोजनावर भर देण्यात आला.
दापोडीतील महापुरुषांच्या स्मारकांचा विकास, नवीन पाण्याची टाकी, नदीपात्राच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत, स्मशानभूमी व दफनभूमीचा विकास, हुतात्मा भगतसिंग शाळेचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.
नागरिकांच्या आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने दवाखाना, जिम आणि विरंगुळा केंद्र, तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक भवन आणि प्रशासकीय इमारतीच्या उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, स्विमिंग पूल आणि प्लेग्राउंड यांसारख्या सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे.
पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनची कामे, तसेच अंतर्गत व प्रमुख रस्त्यांच्या दर्जेदार विकासासाठी काँक्रीट रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले. विशेषतः गणेश नगर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बोपोडी पूल, एसटी रोड ते फुगेवाडी या महत्त्वाच्या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. हा मार्ग विकसित झाल्यास परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सिद्धार्थ नगर, प्रभाग क्रमांक ३० येथील जुने व अर्धवट अवस्थेतील शौचालय असलेली जागा मोकळी करून त्या ठिकाणी नवीन भवन उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा नागरिकांच्या उपयोगासाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापर होणार आहे. दरम्यान, दापोडी येथे तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाल्याबद्दल दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा आमदार मा. अण्णासाहेब बनसोडे, तसेच महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारीवर्गाबद्दल स्वाती उर्फ माई काटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“दापोडीचा विकास हा केवळ काही रस्ते किंवा इमारतींपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रत्येक सुविधा सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक सुविधा आणि महापुरुषांच्या स्मारकांचा विकास या सर्व कामांचा सातत्याने पाठपुरावा करून दापोडीला अधिक सुंदर, सुरक्षित आणि सुविधासंपन्न बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी सांगितले.
“दापोडीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून ते शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक सुविधा, महापुरुषांच्या स्मारकांचा विकास आणि दर्जेदार रस्त्यांपर्यंत प्रत्येक कामाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. केवळ आश्वासने नव्हे, तर नियोजनबद्ध विकासकामांच्या माध्यमातून दापोडीचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य हीच आमच्या कामाची खरी ताकद आहे.”
— स्वाती उर्फ माई काटे
नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List