सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण

संविधान दिनी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन; स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणार

सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण

पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे सांगवी येथील नूतनीकरण केलेले संविधान शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. संविधान दिनाच्या दिवशीच या शिल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. या माध्यमातून संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२, सांगवी येथे भारतीय संविधान शिल्पाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून या नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी उपस्थितांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा तसेच राष्ट्राची एकता आणि एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास या शिल्पाची निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी. पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सलग मार्गिका तयार कराव्यात. कारवाईला...
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका
‘आकाश ही मर्यादा नाही, नव्या संधींचे प्रवेशद्वार’; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप
शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!