स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर

सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनास उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले

स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर

नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक स्वर भक्ती-शक्ती परिसरात घुमले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापौर लांडगे यांनी YOUVAN संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

पिंपरी-चिंचवड, दि. १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती परिसरात आयोजित विविध देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. Youvan संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन तसेच महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा स्वर — ‘वंदे मातरम्’

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जागविणारे प्रेरणागीत ठरले. स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांवर या गीताने देशवासीयांना एकत्र आणत मातृभूमीप्रती समर्पणाची भावना दृढ केली. या ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व कर्तव्यभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

WhatsApp Image 2026-08-15 at 6.46.42 PM

नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक स्वर भक्ती-शक्ती परिसरात घुमले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापौर लांडगे यांनी YOUVAN संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित

याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात विविध कलाकारांनी राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. महापालिकेतील प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच संगीत आणि गायनाची आवड जोपासणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल महापौर लांडगे यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात बालकलाकार ‘वंडर बॉय’ पृथ्वीराज सतीश इंगळे याने ‘मेरा जूता है जापानी’ हे गीत सादर केले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर लांडगे यांनी पृथ्वीराजचे विशेष कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासाची जबाबदारीही रुजली पाहिजे” — महापौर रवि लांडगे

“स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांतून राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि मातृभूमीप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित होते. नव्या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासातील आपली जबाबदारीही दृढ व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य पंकज भालेकर, अतिश बारणे, जनता व संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह Youvan संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, कलाकार, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-08-15 at 6.46.41 PM (1)

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या दोन्ही उपक्रमांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि नव्या पिढीचा सहभाग यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित...
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 
‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू! 
पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित