इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद

पहाटे ३ ते सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध; वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था

इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद

पिंपरी-चिंचवड : इंद्रायणी नदी संवर्धन, स्वच्छता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-२०२६’च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील १५ मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सायक्लोथॉन सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

 

पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडेवाडी चौक ते गोल्ड जिम चौक आणि गोल्ड जिम चौक ते बोऱ्हाडेवाडी चौक, संतनगर चौक ते साईन सिटी मॉल, आप्पा पाटील चौक ते आरटीओ ऑफिस, सदरार चौक ते मातोश्री हाऊस चौक, संतनगर ते आरटीओ ऑफिस तसेच जाधववाडी चौक ते जाधव सरकार चौक या मार्गांवर वाहतुकीस प्रवेश बंद राहणार आहे.

याशिवाय चेरी चौक, पुण्यनगर, साने चौक, थरमॅक्स चौक, कृष्णानगर, टॉवर लाइन चौक आणि दुर्गानगर चौक परिसरातील विविध मार्गांवरही वाहतूक निर्बंध लागू असतील.

बंद करण्यात आलेल्या मार्गांवरील वाहनचालकांसाठी भारतमाता चौक, देहू-आळंदी रस्ता, शिरोळे रस्ता, डाव्या बाजूचा सेवा मार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सायक्लोथॉनच्या कालावधीत नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बांधकाम...
बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक
इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद
अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका